चालू घडामोडी : ४ जानेवारी

 4 जानेवारी 2021 चालू घडामोडी मराठी मध्ये "दैनिक करंट आणि अफेयर्सचे प्रश्न  उत्तरे मराठी मध्ये प्रकाशित केली जात आहेत.

एका ओळीत सारांश चालू घडामोडी 

  •  सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणारे. सावित्रीबाईंचा जन्मदिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाचा निर्णय.
  • आद्यशिक्षिका, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या गौरवार्थ ३ जानेवारी त्यांचा जन्मदिवस सावित्री उत्सव म्हणून साजरा होतो ! 
  • भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना आपात्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे.
  • रेल्वेनं 10 कोटी 88 लाख टनांपेक्षा जास्त माल वाहतूक केली; हे प्रमाण 2019 च्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत 8.5 टक्क्यांनी जास्त आहे.
  • चित्रपटमहोत्सव  गोव्यात  51 व्या  आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट  महोत्सव IFFI 16 जानेवारीला सुरु होईल.अनादर राऊंड, मेहरूंनीसा, वाईफ ऑफ स्पाय सारख्या 224 चित्रपटांचा महोत्सवात  समावेश  आहे. महोत्सव प्रथमच  ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीनं  होणार आहे.
  • अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बहुचर्चित बैठक औरंगाबादेतील ‘मसाप’मध्ये आज पार पडली. 
  • कोरोना लस वापराची माहिती देणारे डॉ. वेणुगोपाल सोमाणी परभणीचे भूमीपुत्र.
  • 2020 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाला महिलांवरील हिंसाचाराच्या मिळाल्या सर्वाधिक तक्रारी

    इराणकडून आंतरराष्ट्रीय अणुकराराचे उल्लंघन
  • जगभरात आण्विक कार्यक्रमावर लक्ष ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीला (International Atomic Energy Agency) इराणनं ही माहिती दिली.
  • जगभरातील अणुतज्ज्ञ आणि IAEA च्या म्हणण्यानुसार, इराणने अणुशस्त्रास्त्रांचा (Grade Level) साठा वाढवत अंडर ग्राऊंड फोर्ड ऑटोमिक युनिटमध्ये (एटीओएम) 20 टक्के वाढ केलीय.
  • इराणचे हे पाऊल आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय अणुकराराचे सर्वात मोठे उल्लंघन असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
  • 2015 मध्ये झालेल्या आण्विक करारानुसार इराण फक्त 4 टक्के अणु शुद्धते पर्यंत युरेनियमची नोंदणी करू शकतो.
  • पण जेव्हा 2018 मध्ये अमेरिका स्वत: या करारातून बाहेर पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर कडक निर्बंध लादले, तेव्हा इराणी नेत्यांनी या अणुकराराचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली. 

    अण्वस्त्रांची संपन्नता वाढविण्यासाठी कायदा मंजूर
  • इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील शेवटच्या दिवसांत हे पाऊल उचलण्यात आले.
  •  इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने सांगितले आहे की, नुकताच इराणच्या संसदेत एक कायदा मंजूर करण्यात आला असून, त्याचे पालन करण्यासाठी ते फोर्डो इंधन संवर्धन योजनेत 20 टक्के युरेनियमचं उत्पादन वाढवणार आहेत.
  • पण यावर अद्याप कारवाई सुरू झाली आहे की नाही हे अस्पष्ट आहे.
  • इराणचे मुख्य अणुशास्त्रज्ञ फाखरीजादेह यांच्या हत्येनंतर इराणने गेल्या महिन्यात संसदेत हा कायदा केला होता, त्याअंतर्गत युरेनियम समृद्धी वाढविण्यात येत आहे.
  • संसदेत पारित झालेल्या या कायद्यानुसार इराण संयुक्त राष्ट्रसंघाच्या तपासणी पथकाला त्याच्या अणु केंद्रांची तपासणी करण्यापासून रोखू शकतो.


_______________

करंट अफेयर्स क्विझ या वेबसाइटवर दररोज मराठीत प्रकाशित केले जाते. आपल्याला दररोज करंट अफेयर्स क्विझ प्रश्न किंवा करंट अफेयर्स पीडीएफ डाउनलोड करायचे असल्यास दररोज या वेबसाइटला भेट द्या.


यूपीएससी, पीएससी, आयएएस, आरआरबी, बँकिंग, दिवाणी न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, वन विभाग, आयबीपीएस, पीओ क्लर्क, एसबीआय, आरबीआय स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्नोत्तर.


दररोज चालू घडामोडी प्रश्नोत्तरे, परदेशी व भारत सरकारची धोरणे, केंद्र व राज्य सरकारच्या योजना, क्रीडा उपक्रम, पुरस्कार, दिवसा गणिक ताजी अद्ययावत अद्ययावत माहिती पुरविणे हा या संकेत स्थळाचा उद्देश आहे. तर चला 4 जानेवारी 2021 रोजी चालू घडामोडीं बद्दल च्या सविस्तर माहिती जाणून घेऊया.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने