चालू घडामोडी : ७ फेब्रुवारी

 

रोबोट बनवण्यासाठी डीआरडीओ अंतर्गत प्रशिक्षण शाळा सुरू

  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अर्थात डीआरडीओ अंतर्गत य़ेणाऱ्या अभियांत्रीकी विभागानं रोबोट बनवण्याची प्रशिक्षण शाळा सुरू केली आहे. 
  • या शाळेत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत विविध प्रकारचे रोबो बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. 
  • तसंच या विषयात पदव्यूत्तर पदवी आणि डॉक्टरेट देखील होता येणार आहे.
  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या विविध विभागांद्वारे या शाळेचं कार्यान्वयन केलं जाणार आहे.
  •  या द्वारे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी नवं व्यासपीठ मिळणार आहे, असं डीआर डी ओच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

अमेरिकेच्या एच- वन बी व्हिसा नोंदणी प्रक्रियेसाठी अर्ज दाखल

  • अमेरिकेच्या एच- वन बी व्हिसा नोंदणी प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पुढील वित्तीय वर्षात, म्हणजे येत्या 9 मार्चपासून सुरू होणार आहे.
  •  हा अर्ज दाखल केलेल्यांना संगणकाच्या आधारे लॉटरी पद्धतीनं व्हिसा मंजूर केला जाणार आहे.
  •  त्यानुसार यामध्ये यशस्वी झालेल्या अर्जदारांना 31 मार्चपर्यंत व्हिसा मंजूर झाल्याचं कळवण्यात येईल. 
  • अमेरिकेतल्या नव्या बायडन प्रशासनानं नुकतंच लॉटरी पद्धतीनं H-1B व्हिसा जारी करण्यासाठीची पारंपरिक पद्धत यापुढेही सुरू राहणार असल्याचं जाहीर केलं होतं.
  • त्यानंतर एका दिवसातच अमेरिकेच्या सिटिझनशिप आणि इमिग्रेशन सर्व्हिसेसनं ही एच- वन बी व्हिसासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. 
  • हा व्हिसा मंजूर झालेल्या परदेशी व्यक्ति 1 ऑक्टोबरपासून अमेरिकेत नोकरीवर रुजू होऊ शकतील.

कोरोना काळात न्यायालयीन खटल्यांची दूरदृश्य माध्यमातून सुनावणी

  • कोरोना साथीच्या काळात आतापर्यंत देशभरात ६६ लाख ८५ हजार न्यायालयीन खटल्यांची दुरदृश्य माध्यमातून सुनावणी पूर्ण झाली असल्याचं कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल सांगितले. 
  • गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवी समारंभात ते बोलत होते.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या ५२ हजार, उच्च न्यायालयाच्या २० लाख ६ हजार तसंच कनिष्ठ न्यायालयाच्या ४५ लाख ७३ हजार प्रकरणांचा यात समावेश आहे.
  • कोरोना काळात गुजरात उच्च न्यायालयाने १ लाख २१ हजार खटल्यांची दूरदृश्य माध्यमातून सुनावणी केल्यामुळं गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विक्रम राज यांचं त्यांनी अभिनंदन केलं.

आकाशवाणी संगीत संमेलन यापुढे पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन या नावाने ओळखले जाईल

  • आकाशवाणी संगीत महोत्सव हा आता पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत महोत्सव म्हणुन साजरा होणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात केली.
  • भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळानं आयोजित केलेल्या अभिवादन या सांगीतिक कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. 
  • त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.पंडित भीमसेन जोशी हे जीवनात प्रेरणा देणारे गायक होते भारतात लॉक डाऊनच्या काळात शरद पवार यांनी भीमसेन जोशी यांचे गायन एकले असे प्रेरणा दाई भीमसेन जोशी यांची गाण्याचा ठेवा दूरदर्शन आणि आकाशवाणी कडे मोठा साठा आहे 
  • तो आम्ही नव्या स्वरूपात लावणारच सर्वासमोर घेऊन येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
  • पंडित उपेंद्र भट यांच्या अभिनयानानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

प्रस्तावित जुनी वाहनं बाद करण्याचं धोरण

  • केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित असलेलं जुनी वाहनं बाद करण्याचं धोरण वाहन उद्योग तसंच रोजगार निर्मितीला चालना देणारं असल्याचं, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. 
  • ते काल वर्धा इथं वार्ताहरांशी बोलत होते. येत्या पाच वर्षात भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा ऑटोमोबाईल हब म्हणून उदयास येईल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
  •  येत्या १२ तारखेला बायो सीएनजी वर संचालित ट्रॅक्‍टरचं दिल्लीत लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.
  • वर्ध्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात ‘ग्राम स्वराजची आधारशिला’ या विषयावरच्या दोन दिवसीय राष्‍ट्रीय कार्यशाळेचं उद्घाटनही गडकरी यांच्या हस्ते काल झालं. 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने